Magel Tyala Saur Krushi Pump, मागेल त्याला सौर कृषी पंप. :- आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, म्हणजेच येथील अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. भारतात 60% पेक्षा जास्त लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी संबंधित आहे. शेती आणि संबंधित उद्योग हे देशाच्या अन्न सुरक्षा आणि आर्थिक विकासाचा कणा आहेत. भारतात विविध प्रकारचे धान्य, फळे, भाज्या आणि इतर पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
महाराष्ट्रातील शेती आणि वीज पुरवठा :
महाराष्ट्रातील शेतकरी जलसिंचनासाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून वीजेचा वापर करतात. विहिरी, बोअरवेल, नद्या आणि कालव्यांमधून पाणी खेचण्यासाठी पंप वापरले जातात, ज्यासाठी वीजेची आवश्यकता असते.शेतीसाठी वीज पुरवठ्याचे आव्हान हे दरवेळी शेतकर्यांसाठी येक
महाराष्ट्रात शेतीसाठी वीज पुरवठा हा नेहमीच एक आव्हान राहिला आहे. त्यामधे काही प्रमुख समस्या ह्या आहेत की
- लोड शेडिंग: अनेकदा ग्रामीण भागात नियमित वीजपुरवठा होत नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांना जलसिंचनात अडचणी येतात.
- वीज बिलाचे ओझे: शेतकऱ्यांना वीज वापरासाठी मोठे बिल भरावे लागते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावते.
- दिवसाची वीज उपलब्धता: शेतकऱ्यांना बऱ्याचदा रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो, ज्यामुळे दिवसाच्या वेळी शेतीकामे करणे कठीण होते.
सौर ऊर्जा – शेतकऱ्यांसाठी एक पर्याय
ह्या काही कारणामुळे शेतकरी आपल्या पिकांची पाहिजेत तशी काळजी घेऊन पीक पिकू नाही शकत मानूनच या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सौर ऊर्जा आधारित कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. सौर ऊर्जा ही अक्षय, स्वस्त आणि प्रदूषणमुक्त असल्यामुळे, ती शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठ्याचा एक उत्तम पर्याय आहे. अटल सौर कृषी पंप योजना या सौर ऊर्जा योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिवसभर पाणीपुरवठा करता येतो, ज्यामुळे त्यांच्या शेतीसाठी आवश्यक पाणी वेळेवर उपलब्ध होते.
संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रातील शेतीचे भविष्य सौर ऊर्जा आणि इतर अक्षय ऊर्जा स्रोतांवर आधारित आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शेतीला अधिक फायदेशीर बनवण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
स्वतंत्र आणि शाश्वत ऊर्जा स्रोत: या योजनेतून सोलर पॅनेलच्या मदतीने शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी स्वस्त आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा उपलब्ध होते.
- सवलतीत पंप वितरण: सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांना फक्त 10% आणि अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना फक्त 5% रक्कम भरून सोलर पंप मिळतील.
- सरकारकडून अनुदान: शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेपेक्षा उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदानित करते.
- वीजपुरवठ्याची चिंता नाही: सौर उर्जेचा वापर केल्यामुळे वीजेच्या उपलब्धतेचा प्रश्नच येत नाही; दिवसभर पंप चालवता येतात.
- पाच वर्षांची दुरुस्ती हमी: पंपांसाठी पाच वर्षांची देखभाल आणि विमा मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक सुरक्षितता मिळते.
कोण पात्र आहे ?
- जमिनीचे धारक: 2.5 एकरपर्यंतच्या जमिनीच्या मालकांना 3 HP पंप, 2.51 ते 5 एकरपर्यंत 5 HP पंप आणि 5 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या मालकांना 7.5 HP पंप मिळतील.
- पाण्याचे स्रोत असलेले शेतकरी: विहीर, बोअरवेल, शेततळे किंवा शाश्वत पाण्याचे स्रोत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- इतर योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी: ज्या शेतकऱ्यांनी याआधीच्या सौर कृषी पंप योजनांचा लाभ घेतलेला नाही, तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवते आणि सौर उर्जेचा उपयोग वाढवून पर्यावरणाचे संरक्षण करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज करावा.
अर्ज करण्याची प्रोसेस :
शेतकऱ्यांनी खालील पद्धतीने अर्ज करू शकतात:
1. ऑनलाईन अर्ज :
शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या अधिकृत महाऊर्जा (MSIDCL) पोर्टलला भेट द्यावी.
पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सौर कृषी पंप योजनेच्या लिंकवर क्लिक करावे.
त्यानंतर, नोंदणी फॉर्म भरावा, ज्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, बँक खाते तपशील, पत्त्याची माहिती आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी.
आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक, पाण्याच्या स्त्रोताची माहिती (विहीर, बोअरवेल इ.) इत्यादी आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन केलेले प्रत अपलोड करावे.
सर्व माहिती नीट तपासून अर्ज सबमिट करावा.
2. सीएससी (CSC) केंद्रामधून अर्ज:
जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) मध्ये जाऊन अर्ज करू शकता.
तिथे उपस्थित ऑपरेटर तुमची माहिती घेऊन ऑनलाइन अर्ज भरतील.
आवश्यक कागदपत्रे, जसे आधार कार्ड, बँक खाते तपशील, शेतीचा सातबारा उतारा याची प्रत घेवून जावे.
अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक (Application ID) मिळेल.
3. संबंधित कृषी कार्यालयातून अर्ज:
शेतकऱ्यांनी जिल्हा किंवा तालुका कृषी कार्यालयात भेट देऊन अर्जाची माहिती मिळवू शकता.
अधिकारी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करतील आणि आवश्यक कागदपत्रांची यादी देतील.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- सातबारा उतारा / मालकीचे प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
- विहीर, बोअरवेल किंवा शाश्वत पाण्याच्या स्त्रोताचे प्रमाणपत्र
अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया:
अर्ज सबमिट केल्यानंतर, महाऊर्जा किंवा संबंधित विभाग तुमच्या अर्जाची पडताळणी करतील.
पडताळणीनंतर, पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाईल.
योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पंप बसवण्यासाठी अधिकृत डीलरशी संपर्क साधावा लागेल.
पात्रता :
मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी खालील पात्रता धारण करणे आवश्यक आहे,
सर्वप्रथम अर्जदार हा एक शेतकरी असावा तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा उतारा वरती बोरवेल, विहीर, शेततळे नोंद असावी किंवा बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारी जर शेतकऱ्याची जमीन असेल तरच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पारंपारिक वीज कलेक्शन उपलब्ध नसावे तरच लाभ घेता येईल.
ज्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषी पंप या योजनेमध्ये गेल्या वर्षी अर्ज केलेले आहे परंतु अद्याप त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाही असे शेतकरी या योजनेमध्ये परत अर्ज करू शकतात व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ही माहिती आपल्याला शेतकरी मित्रांशी शेअर करा धन्यवाद !!
अर्ज कारणासाठी येथे क्लिक करा –