शेतकरी ओळखपत्र योजना 2025 – घरबसल्या फक्त 2 मिनिटांत मिळवा ओळखपत्र!
Farmar I’d Card, शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
शेतकरी ओळखपत्र (Farmer ID Card) ही सरकारने सुरू केलेली एक नवीन योजना आहे. या कार्डद्वारे शेतकऱ्यांना सरकारी योजना, अनुदान, कर्ज आणि पीक विमा यांसाठी थेट लाभ मिळतो. तसेच, हे कार्ड डिजिटल स्वरूपात उपलब्ध असून अनुदान प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यासाठी मदत करते.
Farmar I’d Card, फायदे – शेतकरी ओळखपत्र का महत्त्वाचे आहे ?
फायदा | सरकारी योजनांचा लाभ |
तपशील | विविध योजना व अनुदान थेट मिळते |
पीक विमा व अनुदान प्रक्रिया जलद होते | शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या फेऱ्यांपासून सुटका मिळते |
शेतीसाठी कर्ज मिळवण्यासाठी महत्त्वाचे | बँका आणि पतसंस्थांकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळते |
बियाणे, खते आणि औषधे सवलतीच्या दरात | शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी होतात |
Farmar I’d Card, शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.
कागदपत्र | महत्त्व |
आधार कार्ड | ओळख निश्चितीसाठी अनिवार्य |
7/12 उतारा | शेतजमिनीच्या मालकीचा पुरावा |
बँक पासबुक | अनुदान व कर्ज थेट खात्यात जमा करण्यासाठी |
उत्पन्नाचा दाखला | योजना आणि अनुदान पात्रतेसाठी आवश्यक |
जातीचे प्रमाणपत्र (अर्जदार SC/ST/OBC असल्यास) | काही योजनांमध्ये विशेष सवलती मिळण्यासाठी |
सक्रिय मोबाइल क्रमांक | ओटीपी पडताळणी व भविष्यातील अपडेटसाठी आवश्यक |
Farmar I’d Card, शेतकरी ओळखपत्रसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.

शेतकऱ्यांना हे ओळखपत्र सहज मिळावे, यासाठी सरकारने ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.
Farmar I’d Card, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अधिकृत पोर्टलला भेट द्या – AgriStack पोर्टल वर जा.
- नवीन खाते तयार करा – संकेतस्थळावर जाऊन “Create My Account” पर्यायावर क्लिक करा.
- 3. OTP पडताळणी पूर्ण करा – आधार क्रमांक टाका आणि OTP पडताळणी करा.
- शेतकरी म्हणून नोंदणी करा – “Register As Farmer” वर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
- E-Sign प्रक्रिया पूर्ण करा – आधार-आधारित ई-साइन पडताळणी करा.
- फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करा – नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल. कार्ड डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.
Farmar I’d Card, शेतकरी ओळखपत्र किती दिवसांत मिळेल ?
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर साधारण 15 ते 30 दिवसांच्या आत शेतकरी ओळखपत्र मिळते. अर्जाची स्थिती तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर तपासू शकता.
शेतकरी ओळखपत्रसंबंधित काही महत्त्वाचे प्रश्न.
शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोण पात्र आहे ?
- अर्जदार भारतातील रहिवासी असावा.
- वय किमान 18 वर्षे असावे.
हे ओळखपत्र काढण्यासाठी शुल्क किती आहे ?
- सरकारकडून ही सेवा मोफत दिली जात आहे. मात्र, काही खासगी सेवा केंद्रे (CSC) त्यासाठी लहान शुल्क आकारू शकतात.
अर्ज करताना काही अडचणी आल्यास काय करावे?
- जवळच्या CSC केंद्रावर संपर्क साधा.
- काही खासगी ऑनलाईन सेवा केंद्रे देखील मदत करतात.
हे पन वाचा – Gai ghota yojna 2025, गाय गोठा अनुदान योजना 2025, शेतकऱ्यांसाठी मोठी संधी
निष्कर्ष :
शेतकरी ओळखपत्र ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. यामुळे सरकारी अनुदान, पीक विमा आणि विविध योजनांचा लाभ जलद मिळतो. फक्त 2 मिनिटांत ऑनलाईन अर्ज करा आणि घरबसल्या आपले शेतकरी ओळखपत्र मिळवा!
अश्याच माहिती करता आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा – Click Hear
1 thought on “Farmer I’d Card 2025, शेतकरी ओळखपत्र योजना 2025, घरबसल्या फक्त 2 मिनिटांत मिळवा ओळखपत्र!”